आर्थिक घोटाळेबाजाराची संपत्तीही जप्त केली जाणार 

लखनऊ  – देशाचा पैसा घेऊन पळालेल्या आर्थिक घोटाळेबाजांना भारतात आणू, असा संकल्प केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. एवढेच नाही तर घोटाळेबाजांची संपत्तीही जप्त केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
लखनौमध्ये एका कार्यक्रमात सिंह म्हणाले, इंदिरा गांधी यांनी बॅंकांचे राष्ट्रीयकरण केले होते. पण माझ्यामते बॅंकेतील व्यवहार सहज-सोपे कसे करता येतील हे महत्त्वाचे आहे.

रेल्वे देशाची लाइफलाइन असून ज्या दिवशी रेल्वे ठप्प पडेल त्या दिवशी देशातील अनेक भागांमधील कामकाज ठप्प होईल, असे त्यांनी सांगितले. आर्थिक घोटाळेबाजांविरोधात केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा हा कायदा अस्तित्वात आला असून मी देशातील जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही मेहनतीने कमावलेला पैसा परदेशात घेऊन पळालेल्यांना भारतात परतावे लागेल. त्यांची संपत्ती जप्त केली जाईल. विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी या प्रकरणांवरून कॉंग्रेसने भाजपावर टीकेची झोड उठवली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त होते कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना राजनाथ सिंह यांनी सीबीआयच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेसवर टीका केली. कॉंग्रेसकडे जनहिताचे मुद्देच नसल्याने ती लोक आता असे मुद्दे हातात घेत आहेत. त्यांनी चौकशी समितीचा अहवाल यायची वाट पाहायला हवी. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात आहे. कॉंगेस मुद्द्यासाठी कधीच रस्त्यावर उतरत नाही, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)