आर्थिक मागासांसाठी आरक्षण समाजात सकारात्मक बदल घडवून आणेल : अमित शहा 

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज मोदी सरकारच्या आर्थिक मागासांसाठी १०% आरक्षणाच्या निर्णयाचे तोंडभरून कौतुक केले आहे. मोदी सरकारच्या निर्णयाबाबत बोलताना भाजप अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, केंद्र सरकारचा आर्थिक मागासांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय समाजात सकारात्मक बदल घडवून आणेल.

यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीम मधील सर्व कॅबिनेट मंत्र्यांचे आभार देखील मानले. ते म्हणाले, “या निर्णयामधून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सर्व मंत्र्यांची जनतेप्रती असलेली वचनबद्धता दिसून येते. मोदी सरकारला देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या पायावर उभे करायचे असून त्यामुळेच असे जनहितार्थ निर्णय सरकार घेत आहे. मोदी आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्रीचे अभिनंदन.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोलताना त्यांनी सरकारने नव्याने दिलेले आरक्षण हे अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाला धक्का न पोहचवता दिले गेले असल्याचे ठळकपणे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)