लक्षवेधी- सैनिकांना अर्थसाहाय्य : बचतीचा मार्ग !

file photo

जयेश राणे

“भारत के वीर’ (लहरीरींज्ञर्शींशशी.र्सीें.ळप) या संकेतस्थळाच्या माध्यमातून पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या सैनिकांसाठी आर्थिक मदतीचा अखंड ओघ वाहत आहे. त्यामध्ये सामान्य नागरिक तसेच काही चित्रपट कलाकार, क्रिकेटर यांचाही सहभाग आहे. सैनिकांना अर्थ सहाय्याच्या माध्यमातून साहाय्य केले जात आहे. हे जग पाहत आहे. देशातील नागरिकांनी सैनिकांना साहाय्य करण्यासाठी घेतलेला पुढाकार नोंद घेण्यासारखा आहे. आर्थिक साहाय्य करण्यासह देशसेवेसाठी वेळही देणे आवश्‍यक आहे.

आपण रजा काढून, रजेच्या दिवशी कित्येक वैयक्‍तिक गोष्टी करत असतो. त्यातूनच वेळ काढून देशसेवेच्या कार्यातही सहभागी झाले पाहिजे. आमच्याकडे वेळ आहे तोही आम्हाला देशासाठी द्यायचा आहे, तर तो कसा देता येईल ? हे सैन्याला विचारले तर तेही नक्‍कीच याविषयी मार्गदर्शन करतील. त्यासाठीही नागरिकांनी पाऊल टाकले पाहिजे. जे आमचे शूर सैनिक अतिरेक्‍यांपासून आपले रक्षण करण्यासह नैसर्गिक आपत्तीतही साहाय्याचा हात देतात, त्यांच्या खांद्यावरील भार हलका करण्यासाठी पुढे येणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

“भारत के वीर’ हे सैनिकांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी एकमेव अधिकृत संकेतस्थळ आहे. त्याचा उपयोग नागरिकांनी करावा. चांगल्या गोष्टी करत असताना त्यात “खो’ घालणारे नतद्रष्टही असतातच. सोशल मीडियावर काही बॅंक अकाऊंट नंबर वेगाने प्रसारित होत आहेत. त्या पोस्टना बळी न पडता योग्य त्याच ठिकाणी आपले धन अर्पण करावे. आपल्या मेहनतीचा पैसा चोरांच्या हाती लागू देऊन त्याचा दुरुपयोग होऊ द्यायचा नसेल, तर सतर्क राहणे आवश्‍यक आहे. आर्थिक साहाय्य करण्यापूर्वी आवश्‍यक ती खात्री केल्यास नंतर पश्‍चाताप करण्याची वेळ येणार नाही.

सैन्य हे पोटावर चालते, असे म्हटले जाते. ते सत्यच आहे. देशाच्या तीनही सेना दलांचा पसारा मोठा आहे. तो सांभाळण्यासाठी प्रचंड प्रमाणावर आर्थिक तरतूदही करावी लागते. सगळी सोंग करता येतात. पण पैशांचे सोंग करता येत नाही. त्यामुळे सेना दलांसाठी पैसा उभा करण्यासाठी कुठे कुठे बचत केली जाऊ शकते ते पाहिले पाहिजे आणि त्याप्रमाणे वाटचालही केली पाहिजे. आज आपण येथे नोकरी-व्यवसाय-शिक्षण-पिकनिक-कौटुंबिक कार्यक्रम करत असलो तरीही सीमेवर कायम दिवस आणि रात्र वैऱ्याचीच आहे. शत्रू एकदा आक्रमण करून थांबत नसतो. तो पुन्हा आक्रमण करण्याची संधी शोधत असतो. हुतात्मा सैनिकांच्या शोकसभा, श्रद्धांजली कार्यक्रम यांसह सैन्यासाठी मी काय करू शकतो, याचा प्रत्येकाकडून विचार झाला पाहिजे.

यंदाचे वर्ष महाराष्ट्रासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वर्ष आहे. निवडणुकांच्या कालावधीत सभा, रोड शो, जाहिराती आदी माध्यमातून प्रचार-प्रसार होत असतो. यासाठी धनही आवश्‍यक असते. या गोष्टींसाठी जे धन उपयोगात आणले जाणार आहे, ते धन सैनिकांसाठी दिले पाहिजे. राजकीय पक्ष याचा गांभीर्याने विचार करतील का ? सैनिकांना त्यातून आवश्‍यक ती शस्त्र खरेदी करण्यास एक मोठा आधार मिळू शकेल.जो राजकीय पक्ष या पद्धतीने करण्याचा विचार करेल आणि त्याप्रमाणे कृतीही करेल ते नागरिकांच्या लक्षात राहतील.

शत्रूचे कंबरडे मोडायचे असेल तर त्या धाटणीची तयारी करण्यासाठी तीनही सेना दलांना भक्कम अर्थ साहाय्य मिळणे आवश्‍यक आहे. शत्रू भारताला कशाप्रकारे लक्ष्य करत आहे, त्याचे आपल्यावर किती बारीक लक्ष आहे. हे पुलवामाच्या आक्रमणातून लक्षात आले आहे. त्यामुळे समोर देशाची सुरक्षेच्या दृष्टीने बिकट स्थिती दिसत असूनही राजकीय प्रचार-प्रसार करण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा देशाच्या सेना दलांची शस्त्रसज्जता वाढवण्यासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. राजकीय पक्षांना हे अवघड काम आहे, असे मुळीच नाही. मनाशी ठामपणे ठरवले तर या मार्गावरून जाता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस यंत्रणेवर ताणही राहाणार नाही आणि तोच वेळ त्यांना नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी देता येईल. राजकीय पक्षांचा तो एक विचार किती गोष्टी सुलभ करू शकतो, हे येथे लक्षात येते.

प्रत्येकजण स्वतःच्या आर्थिक स्थितीप्रमाणे साखरपुडा, विवाह या कौटुंबिक कार्यक्रमांसाठी खर्च करत असतो. देशामध्ये असाही एक मोठा वर्ग आहे जो या दोन्ही कार्यक्रमांवर पाण्याप्रमाणे पैसा खर्च करतो. त्यांच्या या कार्यक्रमांची सर्वत्र चर्चा होत असते. असे हे कार्यक्रम एकदिवसीय असले तरी त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. यावरून खर्च करणाऱ्या मंडळींची आर्थिक बाजू किती भक्‍कम असेल याचा अंदाज येतो. यांसह समाजातील अन्यही मंडळींनीही उंची विवाह सोहळे करण्यासाठी उपयोगात आणले जाणारे धन सैनिकांसाठी अर्पण केल्यास नववधू-वर यांच्याकडून सैनिकांसाठी ती एक मोठी भेट असेल. त्याचा उपयोग सैनिकांसाठी होणार असल्याने यापेक्षा आनंदवार्ता ती कोणती असेल.

अभिनेता सलमान खान याने त्याच्या ‘बीइंग ह्युमन’ या संस्थेच्या माध्यमातून पुलवामा दुर्घटनेच्या निमित्ताने केलेल्या साहाय्याविषयी केंद्रीय गृहराज्यमंत्री रीजीजू यांनी ढथखढ करून त्याचे आभार मानले आहेत. आभार मानण्याची आवश्‍यकता काय आहे? सामान्य नागरिक ही त्यांना जमेल त्या रकमेत आर्थिक साहाय्य करत आहेत. त्यामुळे कोणी वलयांकित व्यक्‍तीने साहाय्य केले म्हणून त्यासाठी ढथखढ करण्याची आवश्‍यकता का भासावी? कठीण काळात करण्यात आलेले साहाय्य हे साहाय्यच असते. त्यामध्ये कोणी विशेष वगैरे असे कोणीही नसते.

पाकिस्तानला बेचिराख करण्यासाठी आमच्या तीनही सेना दलांच्या सैनिकांचे हात केव्हापासून शिवशिवत आहेत. अतिरेक्‍यांचा अड्डा बनलेल्या त्या देशाला नेस्तनाबूत करण्यासाठी भारताला अस्त्र, शस्त्र सज्ज असणे अनिवार्य आहे. चीन पाकिस्तानला शस्त्र सामग्रीची रसद पुरवून भारताला नामोहरम करण्यासाठी अविरतपणे कार्यरत आहे. त्यामुळे समोर दिसण्यास पाकिस्तान असला तरी चीनने त्याच्या बाहुंत ताकद निर्माण केली आहे. भारतावर सतत गोळ्या, बॉम्ब, अतिरेकी कारवाया आदींच्या माध्यमातून स्वतःची पकड निर्माण करण्यासाठी चीनचाही आटापिटा चालू आहे. भारत-पाक सीमेवर भारताच्या संदर्भात कितीही मोठी दुर्दैवी घटना घडली तरी चीनला करुणेचा पाझर फुटत नाही. शत्रू हा शत्रूच असतो. देशावरील संकटाचा एकजुटीने सामना करून शत्रूला धूळ चारण्यासाठी सज्ज राहूया !

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)