नवी दिल्ली: जी 20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित राहणार आहेत. ही परिषद 8 जून पासून जपानमध्ये सुरू होणार असून दोन दिवस चालणार आहे. जपान मधील फुकुओका येथे हि परिषद होणार आहे.
भारताच्या रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हेही या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या परिषेदत जागतिक अर्थव्यवस्थे पुढे निर्माण झालेली आव्हाने, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय कर इत्यादी विषयांवर चर्चा होणार आहे.