अखेर जायकवाडी धरणामधून पाणी सोडण्यात येणार

मराठवाड्याला 8 टीएमसी पाणी मिळणार आहे.

नवी दिल्ली – गेल्या आठ दिवसांपासून उत्तर नगर जिल्ह्यात जायकवाडीला पाणी सोडण्यावरून रणकंदन माजले आहे. त्यात अकोले तालुका दुष्काळी जाहीर करा, या मागणीसह जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात सर्वपक्षीय पाणी बचाव कृती समितीने सरकारला खिंडीत पकडले होते. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्‍न लक्षात घेऊन, तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्यास अखेर 31 ऑक्‍टोबरपर्यंत स्थगिती दिली होती. या संदर्भात आज  सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतर याचिका फेटळाली. त्यामुळे आता मराठवाड्याला 8 टीएमसी पाणी मिळणार आहे.

किती सोडणार पाणी ?

जायकवाडी धरणामध्ये विविध धरणांमधून पाणी सोडण्यात येणार आहे.

मुळामधून 54 दलघमी (1.90 टीएमसी), प्रवरामधून 109 दलघमी (3.85 टीएमसी), गंगापूर धरणातून 17 दलघमी (0.60 टीएमसी), दारणा धरणातून 57.50 दलघमी (2.04 टीएमसी), पालखेड समुहातून 170 दलघमी (60 टीएमसी) असं एकूण 254 दलघमी (8.99 टीएमसी) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)