अखेर तिहेरी तलाक विधेयक मंजूर 

संग्रहित छायाचित्र

आधार आणि अन्य कायदे विधेयकाला ही मंजूरी  Finally, the Triple Divorce Bill was approved

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिहेरी तलाक विधेयकास मंजूरी दिली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुस्लिम महिलांचा विचार करून मोदी सरकार आगामी संसद सत्रात तिहेरी तलाकचे विधेयक सादर करेल. सध्या लागू असलेल्या याबाबतच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी हे विधेयक आणण्यात येणार आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.

त्याच बरोबर केंद्र सरकारने आधार आणि अन्य कायदे (दुरुस्ती) विधेयकालाही मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांक देण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही. शिवाय मंत्रिमंडळाने जम्मू-काश्‍मीर आरक्षण विधेयकालाही मंजूरी दिली आहे. यामुळे जम्मू-काश्‍मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमा भागात राहणाऱ्या नागरिकांना मदत होईल. शिवाय मंत्रिमंडळाने जम्मू काश्‍मीरमध्ये सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढवण्यासही मंजूरी दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)