…अखेर पोलिसांनीच काढले ते फ्लेक्‍स

महापालिका प्रशासन कारवाई करत नसल्याने उचलले पाऊल

पुणे – शहराला विद्रूप करणारे फ्लेक्‍स काढण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, महापालिका त्याकडे दुर्लक्ष करते. कारवाई केलीच तर एखादी दुसरी कारवाई करून पुन्हा काही महिने संबंधित परिसरात महापालिकेचे पथक फिरकतही नाही. यामुळे फ्लेक्‍स बाजांचे चांगलेच फावते. फ्लेक्‍सने केवळ शहरातील चौकांचे विद्रूपीकरण होते असे नाही, तर फ्लेक्‍स बाजीतून गुन्हेगारीचे उद्दात्तीकरणही झालेले दिसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुन्हेगार आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या फ्लेक्‍स बाजीतून काही मारहाणीच्या आणि दहशत माजवण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या घटनांमुळे अनेकदा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता महापालिकेने फ्लेक्‍स बाजीचा विषय गांभीर्याने घेणे आवश्‍यक आहे. मात्र, अनेकदा पोलिसांनी पत्र देऊनही महापालिका कारवाई करत नाही. यामुळे दत्तवाडी पोलिसांनी नाईट शिफ्टमध्ये हे स्वत: हे फ्लेक्‍स टराटरा फाडत काढले आहेत.

अनेकदा चौकातील सर्वच जागा फ्लेक्‍सने व्यापलेल्या असतात. यामुळे शहराचे विद्रूपीकरण तर होतेच शिवाय वाहनचालकांचे लक्षही विचलीत होते. अनेक फ्लेक्‍स तर सिग्नल यंत्रणा झाकूण टाकणारे असतात. फ्लेक्‍स लावण्यावरून अनेकदा चढाओढ होत असताना दिसते. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच गुन्हेगार फ्लेक्‍स बाजीतून परिसरात स्वत:चे वर्चस्व असल्याचे दाखवतात. दत्तवाडी, ताडीवाला रोड ,सिंहगड रस्ता, उपनगरांमध्ये तसेच शहराच्या काही मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात अशी फ्लेक्‍स बाजी दिसते. महापालिका महिन्या दोन महिन्याने कारवाई करून फ्लेक्‍स काढते. मात्र, कारवाईत सातत्य नसते. तर काहीवेळा राजकीय पदाधिकारी कारवाईत अडथळा आणतात. सध्यातर वाढदिवसानिमीत्त फ्लेक्‍सबाजीचे पिकच आले आहे.

दत्तवाडी पोलिसांनी घेतला पुढाकार
दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाचप्रकारे फ्लेक्‍सबाजीला उधाण आले होते. यासंदर्भात पोलिसांनी अनेकदा महापालिकेला पत्रही लिहले होते. मात्र, अखेर दत्तवाडी पोलिसांनी पुढाकार घेत नाईट राऊंडला हे फ्लेक्‍स काढून टाकले. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी सांगितले, पोलीस ठाण्यात नागरिकांशी संवाद साधताना अनेकदा चौकात लावल्या गेलेल्या फ्लेक्‍स संदर्भात विषय निघतो. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचे सांगितले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)