काँग्रेसकडून पुणे लोकसभेची उमेदवारी अरविंद शिंदेंना?

पुणे: पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपाने गिरीश बापट यांचे नाव जाहीर केल्यानंतर प्रतिक्षा होती ती कॉंग्रेसकडून कोणता तगडा उमेदवार देण्यात येणार असल्याची पण आताही प्रतिक्षा संपली असल्याचे समजते. अखेर कॉंग्रेसने महापालिकेतील विरोधी पक्ष नेते अरविंद शिंदे यांचे नाव अंतीम केले असल्याचे समजते. अद्याप त्यांची अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच याबाबत अंतीम निर्णय होईल.

पुण्यात मोहन जोशी,ऍड.अभय छाजेड अरविंद शिंदे तसेच मराठा महासंघाचे प्रविण गायकवाड हे कॉंग्रेसकडून इच्छुक होते पण यातून कोणाला तिकिट द्यायचे याचा निर्णय होत नव्हता अखेर याबाबत चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांना दिल्ली मध्ये वरिष्ठांनी बोलवून घेतले होते.त्यावेळी झालेल्या बैठकीत हे नाव अंतीम झाल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)