अखेर क्‍यूबाच्या जनतेला मिळाले इंटरनेट वापरण्याचे स्वातंत्र्य

हवाना (क्‍यूबा): अखेर क्‍यूबाच्या जनतेला इंटरनेट वापरण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. यापूर्वी क्‍यूबाच्या नागरिकांना इंटरनेट वापरण्याचे स्वातंत्र्य नव्हते. इंटरनेटचा वापर करणारा क्‍यूबा हा जगातील शेवटचा देश बनला आहे. क्‍यूबा दूरसंचारचे अध्यक्ष मायरा अरोविच यांनी मंगळवारी राष्ट्रीय टेलिव्हिजनवर इंटरनेट वापरासंबधी घोषणा केली. क्‍यूबन जनतेला प्रथमच इंटरनेट वापरण्याचा आनंद घेता येणार आहे. गुरुवारपासून क्‍यूबन जनतेला 3 जी सेवेचा वापर करता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी फक्त सरकारी अधिकाऱ्यांना ई-मेल करण्यासाठीच फोनवर इंटरनेटचा वापर करता येत होता. आता क्‍यूबन सरकार शहरांमध्ये 3 जी नेटवर्क सुरू करत आहे. सन 2017 मध्ये क्‍यूबाने घरगुती इंटरनेटला मान्यता देत देशातील विविध पार्क्‍स आणि प्लाझांमध्ये शेकडो सार्वजनिक वाय फाय कनेक्‍शन पॉइंट्‌स सुरू केले होते. आता मात्र क्‍यूबाच्या जनतेला खऱ्या अर्थाने इंटरनेट वापराचे स्वातंत्र्य मिळाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)