अखेर बेजोस दाम्पत्य झाले विभक्त

जगातल्या सर्वाधिक महागड्या घटस्फोटाला मंजुरी

सन फ्रान्सिस्को – जगातील आघाडीवर असलेल्या ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी बेजोस यांच्या घटस्फोटाला अखेर सिएटल येथील न्यायालयाने मंजुरी दिली आहे. “ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार, पोटगी म्हणून मॅकेन्झी बेझोस यांना 38.3 अब्ज डॉलर (सुमारे 25 लाख कोटी रुपये) दिले जाणार आहेत. परिणामी, हा घटस्फोट जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक असल्याचे मानले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेली 25 वर्षे पती-पत्नी असलेले जेफ व मॅकेन्झी हे दाम्पत्य अखेर विभक्त झाले आहे. याबाबत जानेवारी महिन्यातच त्यांनी ट्‌विटरद्वारे माहिती दिली होती. जेफ व मॅकेन्झी यांनी मुलांच्या पालकत्वासंबंधी स्वतंत्र समझोता केला आहे. या घटस्फोटानंतर मॅकेन्झी या जगातील तिसरी सर्वात श्रीमंत महिला ठरणार आहेत.

जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत संपत्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी शक्‍यता आहे. मॅकेन्झी यांना ही संपत्ती कंपनीच्या शेअर्सच्या रुपामध्ये मिळेल, अशी माहिती आहे. ऍमेझॉनचे चार टक्के भागभांडवल नावावर झाले तरी त्याचे कंपनीच्या सभांमधील मतदानाचे हक्क मात्र मॅकेन्झी यांच्याकडे येणार नाहीत. त्यामुळे ऍमेझॉनचे नियंत्रक मालक ही जेफ यांची बिरुदावली कायम राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)