ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन

कोल्हापूर – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी निधन झाले. त्यांनी 13 हून अधिक मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केले होते.

नाथा पुरे आता, राजमाता जिजाऊ, लेक लाडकी, हाय कमांड हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. यशवंत भालकर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्षही होते. जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओ वाचवण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. नुकताच शालिनी स्टुडिओच्या जागेवर बांधकाम करण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. त्याचा आनंद दोन दिवसांपूर्वीच त्यांनी साजरा केला होता. रंकाळा तलाव वाचवण्यासाठीही त्यांचे मोलाचे योगदान होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)