दोन तहसिलदारांवर गुन्हा दाखल

कोल्हापुरातील घटनेने महसूल विभागात खळबळ
जमिनीच्या बनावट दस्ताआधारे फसवणूक

कोल्हापूर –
कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्‍यातील बालिंगा येथील गट क्र. 237 जमिनीचे मृत सहहिस्सेदार रामचंद्र माळी यांच्या नावे बनावट वटमुखत्यारपत्राच्या आधारे दस्तनोंद, जागेचे हिस्से करून फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार योगेश खरमाटे व उत्तम दिघे यांच्यासह 17 जणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये खरमाटे, दिघे यांच्यासह बालिंगा येथील मंडल अधिकारी शंकर एन. नांगरे, तलाठी शरद नलवडे, भूमी अभिलेख उपअधीक्षक पल्लवी शिरकोळे, कुंभार, जिनगोंडा पाटील, आशा पाटील, मुवर रशिद पठाण (रा. सांगली वेस, इचलकरंजी), वैष्णवी राणे, संजय पवार (राजारामपुरी, कोल्हापूर), प्रदीप इंगवले (शिवाजी पेठ), उमेश झंजे (30, कावणे, करवीर), सरिता माने (45, जरगनगर), दीपक माने (जरगनगर), इंद्रजित पाटील, बाबुराव पाटील (दोघे रा. कळंबा) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बालिंगा येथील फिर्यादी शांताराम श्रीपती माळी यांनी तत्कालीन तहसिलदार व अन्य संशयितांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (वर्ग 1) यांच्या न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकाऱ्यासह 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे, हवालदार संजय कोळी यांनी सांगितले. पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, माळी यांच्या मालकीची बालिंगा येथे गट नंबर237 मध्ये
जमीन आहे. खरमाटेसह अन्य संशयितांनी सहहिस्सेदार रामचंद्र माळी यांच्या नावे असलेल्या बनावट वटमुखत्यारपत्राच्या आधारे दस्त नोंदविला.

न्यायालयाने करवीर पोलिसांना चौकशीसह कारवाईचे नुकतेच आदेश दिले होते. त्यानुसार 17 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे. संशयित खरमाटे हे सद्या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार म्हणून, तर दिघे हे वर्धा येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. दरम्यान, कोल्हापुरात घडलेल्या या प्रकारामुळे राज्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)