सय्यद शुजाच्या विरोधात दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल

नवी दिल्ली: अमेरिकात स्थित सायबर तज्ज्ञ सय्यद शुजा याच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. शुजा याने सन 2014 सालची लोकसभा निवडणूक भाजपने मतदार यंत्रे हॅक करून जिंकली होती असा दावा लंडन मध्ये स्काईपवर पत्रकार परिषद घेऊन केला होता. तो दावा चुकीचा असल्याचे नमूद करून निवडणूक आयोगाने त्याच्या विरोधात पोलिसांत काल तक्रार दिली होती त्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भारतीय दंडविधानाच्या कलम 505 अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पार्लमेंट स्ट्रीट पोलिसांनी दिली आहे. आता या कायद्यानुसार त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. शुजा याने केलेल्या आरोपांमुळे लोकांच्या मनात इलेक्‍ट्रॉनिक मतदार यंत्रांविषयी नाहक गैरसमज व भीती निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने पोलिसांनी या आरोपांची सविस्तर चौकशी करावी अशी सुचनाही निवडणूक आयोगाने पोलिसांना केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)