कुकडीच्या पाण्यासाठी पुणेकरांशी संघर्ष करणार : डॉ. विखे

पालकमंत्र्यांची फ्री स्टाईल ठरली लक्षवेधी

श्रीगोंदा: विरोधी उमेदवार श्रीगोंद्यात प्रचाराला आले. मात्र कुकडी पाण्यासंदर्भात काहीच बोलले नाही. कुकडी हे श्रीगोंद्यासाठी आहे, हे कदाचित त्यांना माहीत नसेल. कुकडीच्या पाण्यासाठी पुणेकरांशी संघर्ष करणारा नेता निवडून द्या, असे आवाहन भाजपचे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केले.

काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रा. राम शिंदे होते. यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पा. म्हणाले, श्रीगोंदे तालुका स्वतःचे घर मानणाऱ्यांनी विधानपरिषदेच्या माध्यमातून तालुक्‍यासाठी किती निधी दिला. ज्या तालुक्‍याचा एक ही प्रश्‍न कधी तुम्ही उठवला नाही, तो तुमचा तालुका कसा. आमदार असताना अशी काय कामे केली, ज्यामुळे शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान करावे. बबनराव पाचपुते हेच आमचे विधानसभेचे उमेदवार अन्‌ उद्याचे तालुक्‍याचे आमदार आहेत. व्यासपीठावर बसलेला दुसरा कोणीही इच्छुक नाही. कुकडीचे पाणी उद्या सोडण्यात येणार आहे.

माजी मंत्री पाचपुते म्हणाले, तुमच्यामुळे मी पुणेकरांशी भांडलो, नेत्यांशी भांडलो. कार्यकर्ता सोबत असल्याने मला कशाची पर्वा नाही. राधाकृष्ण विखे प्रचारासाठी नाहीत, वडीलकीची कमी आम्ही जाणवू देणार नाही.
सदाशिव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, भगवानराव पाचपुते, बाळासाहेब नाहाटा, शशिकांत गाडे, पुरुषोत्तम लगड, दत्तात्रेय पानसरे, विक्रमसिंह पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर, बाळासाहेब गिरमकर, बाळासाहेब महाडिक, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके उपस्थित होते.

पालकमंत्र्यांची फ्री स्टाईल ठरली लक्षवेधी

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे फ्री स्टाईल भाषण सर्वाधिक लक्ष्यवेधी ठरले. ते म्हणाले, गर्दीच्या बाबतीत श्रीगोंद्याने रेकॉर्ड ब्रेक केलं आहे. भाषण कसे असावं सुजय सारखे. मावळच्या गड्याला भाषण जमेना. आरं आला कशाला रिंगणात, दोन चार वर्षांनी यायच ना, इथंच ही अवस्था तर लोकसभेत काय करेल, (ऍक्‍टिंग करून पार्थची खिल्ली उडविली, एकच हशा) जागा धरली, सोडली तसा धंदा आम्ही करीत नाही. अभिमान अन्‌ स्वाभिमान असतो की नाही काही? म्हणून पलीकडे घुसून आतंकवादी मारली. नगर-दौंड रोड कसा चाललाय? अनेक वर्षे खड्डाच पडणार नाही.

“सुजय दादा ‘त्यांच्या’वर विश्‍वास ठेऊ नका’

सेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी आ. शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेता उट्टे काढले. ते म्हणाले, आगामी विधानसभेत नगर तालुक्‍यातून पाचपुतेंना प्रचंड मताधिक्‍य मिळवून देऊ. 2014 ला पाचपुतेदादा तुमचा पराभव माझ्यामुळे नाही, तर तुमच्या पक्षातील आमच्या तालुक्‍यातील नेत्यामुळे झाला. सुजय दादा अशा नेत्यांवर विश्‍वास ठेवू नका. नगर तालुक्‍याची कमी इतर तालुक्‍यांत भरून काढा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)