ईरानमध्ये मालकवाहक विमान कोसळले, 15 जणांचा मृत्यू

तेहरान – ईरानची राजधानी तेहरानमधील पश्चिम भागात सोमवारी मालवाहक विमान आपत्कालीन स्थितीत खराब हवामानात इमर्जन्सी लॅंडिंग करताना दुर्घटनाग्रस्त झाल्याने विमानातील 16 लोकांपैकी 15 जणांचा मृत्यू झाला.

ईरानच्या अर्द्ध सरकारी संवाद समिति फार्स समाचार एजन्सीने सेनेच्या संदर्भातून सांगितले की, ‘अलबोरज प्रांतच्या कारज क्षेत्रात विमानतळाच्या जवळ विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमान दुर्घटनेत वैमानिकाला वाचविण्यात यश आले आहे. त्याला दुर्घटना होताच रूग्णलयात नेण्यात आले’.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सेनाने माहिती दिली आहे की, ‘बोइंग कार्गो विमान 707 हे फाथ विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरविण्याचा प्रयत्न केला. विमान उतरविण्याच्या प्रयत्नात रनवेवरून बाहेर गेले आणि भिंतीला धडकले. भिंतीला धडकताच विमानाला आग लागली, आणि विमान दुर्घटनाग्रस्त झाले’.

ईरानच्या सरकारी टेलिव्हिजनच्या माहितीनुसार बचाव पथक दुर्घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. टेलिव्हिजनवर दुर्घटना स्थळावरील विमानला लागलेली आग आणि धूराचे लोट मोठ्या प्रमाणात दिसत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)