फिफा विश्वचषक: आम्ही सर्वोत्तम खेळ करण्यात कमी पडलो – साउथगेट

आम्ही सर्वोत्तम खेळ करण्यात कमी पडलो; पण यातून योग्य तो धडा निश्‍चितच घेऊ. बाकी सारे काही मैदानातच सोडून आलो आहोत, अशी प्रतिक्रिया इंग्लंड संघाचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांनी व्यक्‍त केली. उपान्त्य फेरीत इंग्लंडला क्रोएशियाने नमविल्यानंतर साऊथगेट यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले की, पूर्वार्धात आमचा खेळ चांगला झाला होता. कदाचित आम्ही आणखी एक गोल करू शकलो असतो.

जेव्हा तुम्ही दर्जेदार संघाविरुद्ध खेळत असता, तेव्हा तुम्हाला धोका पत्करावाच लागतो. मात्र, तरीही सर्वोत्तम खेळ करण्यात आम्ही कमी पडलो. लढत संपल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंचे सांत्वन करताना साऊथगेट म्हणाले की,या क्षणी मी खेळाडूंना काही जास्त विचारू शकत नाही. त्यांना चांगले वाटेल, असेही या क्षणी काही बोलणे अशक्‍य आहे. मात्र आम्ही जे काही साध्य केले, त्याचा मला अभिमान वाटतो एवढेच मी सांगेन.

साऊथगेट हे क्रोएशियाच्या खेळाडूंचे कौतुक करायला विसरले नाहीत. क्रोएशियाचा संघ विजयासाठी पात्र होता, असे सांगतानाच आता झाले गेले विसरून आम्हाला पुढे जायला हवे. अशा निराशाजनक स्थितीत एक संघ म्हणून आम्हाला एकमेकांसोबत राहायला हवे, असेही साऊथगेट यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)