फिफा विश्वचषक: या विश्वचषकातील १००वा गोल मारून मेस्सीची रीएन्ट्री 

सध्या चालू असलेला फिफा विश्वचषक एक विशिष्ट वैयक्तिक लढाईबद्दल अधिक असल्याचे दिसत आहे तर दिग्गज खेळाडूही या विश्वचषकात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून हा फुटबॉल खेळत आहेत. अशाच दिग्गज खेळाडूंमधील एक नाव म्हणजे लिओनेल मेस्सी.

लिओनेल मेस्सी हा एक उत्तम फुटबॉल खेळाडू आहे. नाजेरियाविरुद्ध मेस्सीने या  विश्वचषकातील १००वा गोल केला आहे. फिफा विश्वचषकामध्ये सुरुवातीपासूनच मेस्सीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या अर्जेंटिना संघाला अडचणींचा सामना करावा लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र कालच्या सामन्यात अर्जेंटिनाने सुरुवात सकारात्मक केली. मेस्सीने १४ व्या मिनिटाला गोल केला आणि फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाने साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात नायजेरियाचा २-१ ने पराभव केला. या विजयाने अर्जेंटिना अंतिम १६ मध्ये पोहोचला आहे.

दरम्यान, मेस्सीने सोशल मिडीयावर आपल्या चाह्त्यांच्याचे आभार मानले आहेत

 

https://www.facebook.com/leomessi/posts/2298445170175064

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)