‘चक दे इंडिया’ माॅस्को मध्ये वास्तविक घडला. फ्रान्सचे माजी खेळाडू डिशचॅम्प्स यांनी एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून फ्रान्सला दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून दिला.
क्रोएशिया आणि फ्रान्स सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांकडून जोरदार ऍक्शन पाहायला मिळाली. सामन्याच्या 18व्या मिनिटात फ्रान्सला फ्री किक मिळाली. फ्रान्सला मिळालेल्या फ्री किकचा बचाव करताना क्रोएशियाकडून मॅन्झुकिचने आत्मघातकी ओन गोल केला. त्यामुळे फ्रान्सला आघाडी मिळाली. आणि फ्रान्स विश्वविजेता ठरला!विश्वविजेता फ्रान्सच्या खेळाडूप्रमाणे त्यांचे प्रशिक्षक डिशचॅम्प्स विजयाचे शिल्पकार ठरले. 1998 नंतर फ्रान्सने दुसऱ्यांदा विश्वकरंडक जिंकला.
विशेष म्हणजे फ्रान्सने 1998 साली जिंकलेल्या विश्वचषकात प्रशिक्षक डिशचॅम्प्स खेळले होते. त्यामुळे त्यांनी फ्रान्सला दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून दिला.1998 साली पॅरिसमध्ये फ्रान्सने ब्राझीलला 3-0 ने मात दिली होती. तेव्हा डिशचॅम्प्स यांनी आपल्या टीमचे कर्णधार पद भूषविले होते.

डिशचॅम्प्स हे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकणारे तिसरे व्यक्ती आहेत. यापूर्वी ब्राझीलच्या मारियो झॅगेलो आणि जर्मनीच्या फ्रान्झ बेकनबॉएर यांनी हा विक्रम केला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा