फिफा विश्वचषक : फ्रान्सचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश ; मेस्सीचे स्वप्न भंगले

कझान: भल्याभल्यांचे अंदाज चुकवीत पार पडलेल्या साखळी फेरीनंतर फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या बाद फेरीला आज प्रारंभ झाला. यातील पहिल्या लढतीत पाचव्या स्थानावरील अर्जेंटिनाला पराभव पक्तरावा लागला. फ्रान्सने 4-3 असा विजय मिऴवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या पराभवामुऴे अर्जेंटिनाचे आव्हान संपुष्टात आले असून लिओनेल मेस्सीचे स्वप्न देखील भंगले आहे.

मेस्सीच्या पासवर गॅब्रियल मेर्काडोने हलका टच लावताना चेंडूला गोलजाऴीच्या दिशेने वाट मोकऴी करून दिली. पण विश्वचषक स्पर्धेत मागील सहा सामन्यांत पहिला गोल केल्यानंतर विजय मिऴवण्यात यशस्वी ठरलेल्या फ्रान्सने 57व्या मिनिटाला बेंजामिन पाव्हार्डने कारकीर्दितील पहिला आंतरराष्ट्रीय गोल करताना फ्रान्सला 2-2 अशी बरोबरी मिऴवून दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अर्जेटिनाचा साखळी फेरीतील आलेख पाहिल्यास बाद फेरीत त्यांच्या कामगिरीचा अंदाज बांधणे अवघड होते. पात्रता फेरीत त्यांनी उरुग्वे आणि ब्राझिल पाठोपाठ कसेबसे तिसरे स्थान प्राप्त केले होते. मात्र पात्रता फेरीत त्यांना चार पराभवही पत्करावे लागले होते. आणि गट साखळी फेरीत तर अखेरच्या क्षणी मिळवलेल्या विजयाच्या जोरावर अर्जेंटिना बाद फेरीत दाखल झाला होता.

https://twitter.com/FIFAWorldCup/status/1013088360355770369

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)