जर्मनीत भारतीय दांपत्यावर जीवघेणा हल्ला 

संग्रहित छायाचित्र...

सुषमा स्वराज यांची मदतीसाठी धाव

नवी दिल्ली – जर्मनीत भारतीय दांपत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी जखमी झाली आहे. हा हल्ला म्युनिच येथे एका इमिग्रंटने केला आहे. ही माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. या घटनेबद्दल त्यांनी शोक व्यक्त करत कुटुंबीयांना जर्मनीला पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.

सुषमा स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतीय दांपत्य प्रशांत आणि स्मिता बसारुर यांच्यावर म्युनिच येथे इमिग्रंटने हल्ला केला आहे. दुर्दैवाने प्रशांत यांचा मृत्यू झाला आहे. स्मिता यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु आहेत. प्रशांत यांच्या भावाला जर्मनीला पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या घटनेने मला दुख: झाले आहे.  दरम्यान, सुषमा स्वराज यांनी तेथील भारतीय मिशनला पीडितांच्या मुलांची काळजी घेण्याची सूचना केली आहे. सुषमा स्वराज यांनी सहकार्य केल्याबद्दल जर्मनीमधील अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)