भारतीय वंशाचे अक्षय वेंकटेश गणितातील नोबेल ‘फील्ड्स मेडल’ने सन्मानित

न्यूयॉर्क – मूळ भारतीय वंशाचे गणितज्ञ अक्षय वेंकटेश यांना ‘फील्ड्स मेडल’ने सन्मानित करण्यात आले आहे. फिल्डस मेडलला गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानले जाते. रिओ डी जनेरियो येथील आंतरराष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये बुधवारी वेंकटेश यांना (वय ३६) या पुरस्काराने गौरविण्यात आले. चार वर्षातून एकदा हा पुरस्कार देण्यात येतो. तसेच ४० वर्षाखालील गणितज्ज्ञला दिला जातो.

अक्षय वेंकटेश मुळ भारतीय असून ते स्टॅनफोर्ड विश्वविद्यापीठात प्राध्यापक आहेत. वेंकटेश हे फिल्ड्स मेडल जिंकणारे दुसरे भारतीय असून पहिला पुरस्कार २०१४ मध्ये मुळचे भारतीय मंजुळ भार्गव यांना देण्यात आला होता.

-Ads-

याशिवाय अन्य तीन जणांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यामध्ये कॅम्र्बिज विद्यापीठातील प्राध्यापक कौचर बिरकर (४०), स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एलिसो फिगाली (३४) आणि बॉन विद्यापीठाचे पीटर स्कूल्ज यांना हे मेडल मिळाले आहे.

सर्व विजेत्यांना गोल्ड मेडलसहित १५ हजार कॅनडीयन डॉलर पुरस्कार स्वरुपात मिळाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)