England vs South Africa: साऊथ आफ्रिकेचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

लंडन: क्रिकेट विश्‍वाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या स्पर्धेला आज यजमान इंग्लंड आणि बलाढ्य दक्षिण अफ्रिकायांच्यातील सामन्याने सुरूवात होणार असुन दोन्ही संघ यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाचे प्रमुख दावेदार संघ आहेत. मात्र, आजच्या सामन्यात यजमान इंग्लंडचा संघ विजेतेपदाचा प्रमुख दावेदार समजला जात असुन आजच्या सामन्यात विजय मिळवून पहिल्यांदा विश्‍वचषक विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न पुर्ण करण्याच्या दृष्टीने इंग्लंडचा संघ सुरूवात करणार आहे. दरम्यान, साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

2015 साली झालेल्य विश्‍वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या संघाचे आव्हान सखळी फेरीतच संपुष्टात आले होते. त्यामुळे त्यावेळी त्यांच्या संघावर बरीच टिका केली गेली. मात्र, सर्व टिकांना मागे टाकत इंग्लंडच्या संघाने गेल्या चार वर्षात बरीच प्रगती केली असुन कर्णधार इऑन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ बराच सुधारलेला असल्याचे गेल्या काही महिण्यात समोर आले आहे. यावेळी विश्‍वचषकापुर्वी झालेल्या सराव सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला असला तरी अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी केलेल्या फलंदाजीवरुन यंदा त्यांच्या संघाला स्पर्धेच्या विजेतेपदाचे प्रमुख दावेदार का मानले जात आहे याचा प्रत्यय आला. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सराव सामन्यांमध्ये चांगली कामगिरी नोंदवली असुन आफ्रिकेचा संघ देखील आपल्यावरील चोकर्सचा डाग पुसण्यास उत्सूक असल्याचे या वेळी प्रामुख्याने जानवत आहे.

विश्‍वचषक स्पर्धेची तयारी सुरू असताना अचानक ए.बी. डीव्हिलियर्सने निवृत्त्ती स्विकारल्यानंतर चांगलाच अडचणीत आलेला आफ्रिकेचा संघ गत काही वर्सांमध्ये आपल्या कामगिरीने सर्व अडचणींवर मात करुन पुढे आला असल्याचे जानवत असुन सध्या त्यांच्या संघाची प्रमुख मदार ही त्यांच्या गोलंदाजांवर असुन लुंगी एनगीडी आणि कगिसो रबाडा हे त्यांच्यासाठी प्रमुख गोलंदाज ठरतील यात शंका नाही.

तर, दुसरीकडे इंग्लंडचा संघ गत काहीमहिण्यात सर्वात समतोल संघ समजला जात असुन त्यांच्या संघात असलेले अष्टपैलू खेळाडू हे त्यांची सर्वात मोठी ताकत आहेत. ज्यात बेन स्टोक्‍स आणि मोईन अली यांच्यावर त्यांची मदार असनार आहे.
त्यातच विश्‍वचषक स्पर्धेचा आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास विश्‍वचषक स्पर्धेच्या सलामी सामन्यांवर आतापर्यंत यजमान संघांचेच वर्चस्व राहिले आहे. यजमान संघाचा समावेश असलेल्या 9 पैकी विश्‍वचषकाचे सात सलामी सामने यजमानांनी जिंकले आहेत. ज्यात दक्षिण आफ्रिका (2003) व बांगलादेश (2011) हे दोनच सलामी सामने गमावणारे यजमान आहेत. 1979 आणि 1996 च्या विश्‍वचषक स्पर्धेचा सलामी सामन्यात यजमान संघ अनुक्रमे इंग्लंड व भारत यांचा समावेश नव्हता. त्याच बरोबर विश्‍वचषक सलामी सामन्यांचे आणखी एक वैशिष्ट्‌य म्हणजे 11 पैकी 9 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. केवळ 1979 व 1999 चा विश्‍वचषक सलामी सामनाच दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकला आहे. तर, 2007 पर्यंत तर विश्‍वचषक सलामी सामन्यात “टॉस जिंका, मॅच जिंका’ अशी स्थिती होती. गेल्या दोन विश्‍वचषकात मात्र टॉस जिंकणाऱ्या बांगलादेश (2011) आणि श्रीलंका (2015) यांनी सलामी सामना गमावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)