खतांच्या विक्रीसाठी “ब्लॉक पातळीवर’ तपासणी

पुणे – राज्यात अनुदानित खतांची विक्री करण्यासाठी परवानाधारक खतविक्रेत्यांना पॉस मशीनद्वारे खतांची विक्री करण्याचे आदेश शासनाने दिले असून, त्याची तपासणी “ब्लॉक पातळीवर’ पंचायत समितीचे कृषी अधिकारी करीत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात 1 हजार 95 पॉस मशिन असून, पॉस मशिनबाबत ज्या ठिकाणाहून तक्रारी येतात त्याठिकाणी ब्लॉकनुसार तंत्रज्ञ आहेत. त्यांच्या मदतीने अडचणी सोडविण्यात येत आहेत. दरम्यान, राज्यात अनुदानित खतांची विक्री करण्यासाठी परवानाधारक खतविक्रेत्यांना पॉस मशीनद्वारे खतांची विक्री करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार 1 नोव्हेंबर 2017 पासून जिल्ह्यातील मान्यताप्राप्त परवानाधारक खत विक्रेत्यांना पॉस मशीनचे वितरण करण्यात आले आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना अनुदानित खताची विक्री करण्यात येत आहे. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड आवश्‍यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खताची खरेदी करताना अडचणी येऊ नये म्हणून जिल्हा कृषी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच रासायनिक खत विक्रीचा लाभ थेट हस्तांतरण योजनेंतर्गत अनुदानित खतांची विक्री करण्यासाठी परवानाधारक खत विक्रेत्यांना पॉश मशीन वापरणे बंधनकारक आहे.

-Ads-

दरम्यान, जिल्ह्यातील ज्या खतविक्रेत्यांकडे पॉश मशीन नाही. त्यांना खतविक्री करता येत नाही, असा आदेश कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. पॉस मशीनमध्ये खत विक्रीसाठी उपलब्ध साठा भरण्यात आला आहे. त्यानुसार खतांची विक्री केली जात आहे. यासाठी संबधित दुकानदाराला सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे अनुदानित खत हे फक्‍त मशीन धारकांनाच पुरविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने खत विक्री नियंत्रित केली आहे. कंपनींना विक्री आधारे अनुदान मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)