परवाना रद्द केल्याने महिला अधिकाऱ्याची हत्या 

अमृतसरमधील धक्‍कादायक प्रकार ः आरोपीचीही गोळ्या झाडून आत्महत्या

अमृतसर – आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याची कार्यालयात घुसून गोळ्या घालून हत्या केल्याची घटना चंदीगडमध्ये घडली आहे. केमिस्ट दुकानाचा परवाना रद्द केल्याच्या रागातून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बलविंदर सिंग असे या नराधमाचे नाव असून नेहा यांच्यावर गोळीबार केल्यानंतर बलविंदरने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

नेहा शोरी असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. पंजाब आरोग्य विभागात त्या औषध परवाना अधिकारी म्हणून काम करत होत्या. शुक्रवारी चंदीगडजवळच्या खरड येथील कार्यालयात नेहा काम करत होत्या. सकाळी पावणे बाराच्या सुमारास बलविंदर नेहा यांच्या कार्यालयात घुसला. त्याने नेहा यांच्यावर बेछूट गोळीबार करत तीन गोळ्या झाडल्या आणि तिथून पळू लागला. परंतु तिथे नागरिकांनी त्याला घेरले. लोकांच्या तावडीत सापड्यानंतर बलविंदरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी बलविंदरला ताब्यात घेतले असून त्याला चंदीगढ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेहा यांनी 10 वर्षांपूर्वी बलविंदरच्या औषधांच्या दुकानावर छापा टाकला होता. यावेळी बलविंदरच्या दुकानात नशेची औषधे आढळली होती. त्यामुळे बलविंदरच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षांपासून बलविंदरच्या मनात या गोष्टीचा राग होता. त्यामुळेच बलविंदरने नेहा यांची हत्या केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)