हॅले टेनिस स्पर्धेत फेडरर अंतिम फेरीत

File photo

हॅले – विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या रॉजर फेडरर याने हॅले खुल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. त्याला अजिंक्‍यपदासाठी डेव्हिड गॉफीन याच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.

उपांत्य फेरीत फेडरर याने पिअरी ह्युजेस हर्बर्ट याचा 6-3, 6-3 असा सहज पराभव केला. 37 वर्षीय खेळाडू फेडरर याने या सामन्यात फोरहॅंडच्या ताकदवान फटक्‍यांचा बहारदार खेळ केला. तसेच त्याने वेगवान सर्व्हिसचाही उपयोग केला. उपांत्य फेरीतील अन्य लढतीत गॉफीन याने उदयोन्मुख खेळाडू मेटेओ बेरेटिनी याचे आव्हान 7-6 (7-4), 6-3 असे संपुष्टात आणले. त्याने या लढतीत पासिंग शॉट्‌सचा सुरेख खेळ केला. पहिल्या सेटमध्ये त्याला संघर्ष करावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये त्याने सर्व्हिसब्रेक मिळवित आपल्या प्रतिस्पर्ध्यास फारशी संधी दिली नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here