यंदाच्या निवडणुकांची वैशिष्ट्ये

17 व्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या सार्वत्रिक निवडणुकांची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

– यंदा 90 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. एकूण मतदारांमध्ये 42.1 कोटी या महिला मतदार आहेत. गतवेळीपेक्षा महिला मतदारांची संख्या 2.41 कोटींनी वाढली आहे; तर 2014 पेक्षा एकूण मतदारांची संख्या 8.43 कोटींनी वाढली आहे.

– यावेळी 10 कोटी मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. 1.50 कोटी मतदारांचे वय 18 ते 19 वर्षे यादरम्यान आहे.

– तृतीयपंथी मतदारांची संख्या 38,325 इतकी आहे, तर एनआरआय मतदारांची संख्या 71,735 इतकी आहे.

– यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी देशभरात एकूण 10.36 लाख बुथ असणार आहेत. तसेच या सर्व बुथवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.

– राज्या-राज्यांनुसार मतदारांची संख्या पाहिल्यास उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि महाराष्ट्र ही पाच राज्ये सर्वाधिक मतदारांची संख्या असणाऱ्यांमध्ये आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा असून तेथे 14.27 कोटी मतदार आहेत. 42 जागा असणाऱ्या पश्‍चिम बंगालमध्ये 6.83 कोटी मतदार आहेत. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून तेथे 6.99 कोटी मतदार आहेत. 48 जागा असणाऱ्या महाराष्ट्रात 8.49 कोटी मतदार आहेत. तामिळनाडूत लोकसभेच्या 39 जागा असून तेथे 5.87 कोटी मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.

– आपल्याकडील काही राज्यांतील एकूण मतदारांची संख्या ही अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान यांसारख्या राज्यांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. एकट्या उत्तर प्रदेशात 14.27 कोटी मतदार असून ही संख्या जगातील 77 देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)