भाऊबंदकीमुळे आयएनएलडीमध्ये फूट; अजय चौटाला स्थापणार नवा पक्ष 

चंडीगढ – हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे थोरले पुत्र अजय यांनी शनिवारी नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. त्यामुळे हरियाणातील चौटाला या वजनदार राजकीय कुटूंबातील भाऊबंदकीने भारतीय राष्ट्रीय लोक दल (आयएनएलडी) या पक्षातील फुटीवर शिक्कामोर्तब झाले.

चौटाला कुटूंबातील यादवी उफाळून आल्याने काही दिवसांपूर्वी अजय यांची आयएनएलडीमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर अजय यांनी जिंदमध्ये समर्थकांचा मेळावा घेतला. त्यात त्यांनी धाकटे भाऊ अभय यांना भेट म्हणून आयएनएलडी देत असल्याचे म्हटले. समर्थकांचा मेळावा म्हणजे आयएनएलडीच्या कार्यकारिणीची बैठक असल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र, ती बैठक अवैध असल्याचे सांगत अभय यांनी चंडीगढमध्ये कार्यकर्त्यांचा स्वतंत्र मेळावा घेतला.

थोरले बंधू स्वत:हूनच पक्षातून बाहेर पडल्याचा दावाही अभय यांनी केला. दरम्यान, दोन आठवड्यांचा पॅरोल मिळाल्याने अजय सध्या तुरूंगाबाहेर आहेत. वडील ओमप्रकाश चौटाला यांच्यासमवेत त्यांना 2013 मध्ये शिक्षक भरती घोटाळ्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. चौटाला पिता-पुत्रांना 10 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)