उबेर इट्स, स्विगी आणि झोमॅटो या कंपन्यांना नोटीस

नाशिक – अन्न औषध प्रशासनाने उबेर इट्स, स्विगी आणि झोमॅटो या कंपन्यांना नोटीस पाठविली आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार या कंपन्यांकडे कोणतेही प्रमाणपत्र नसल्याने कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे उबेर इट्स, स्विगी आणि झोमॅटो या ऑनलाईन खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर नाशिक मध्ये बंदी येण्याची शक्यता आहे.

उबेर इट्स, स्विगी आणि झोमॅटो या कंपन्यांनी विक्री केलेले खाद्यपदार्थ खाण्यायोग्य आहेत का?  खाद्यपदार्थांची पोहोच करणारे हे खाद्यपदार्थ सुरक्षित पोहचवतात का? त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे का? याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित कंपन्यांची असल्याचे अन्न औषध प्रशासनाने सांगितले आहे. अन्न औषध प्रशासनाने उबेर इट्स, स्विगी आणि झोमॅटो या कंपन्यांची तपासणी केली असता यांपैकी कोणत्याही गोष्टींची पूर्तता केले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाने उबेर इट्स, स्विगी आणि झोमॅटो या कंपन्यांना नोटीस पाठविली असून पुढील ७ दिवसांच्या आत कायद्याची अंमलबजावणी न केल्यास अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई केली जन आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)