कॅम्प परिसरातील मॉर्डन डेअरीवर एफडीएची कारवाई

सव्वालाख रुपयांचे दही, पनीर, क्रीम जप्त

पुणे – दुग्धजन्य पदार्थ हलक्‍या प्रतीचे व साधारण असताना ते चांगल्या गुणवत्तेचे असल्याचे लेबल लावून चढया भावाने विक्री करणाऱ्या कॅंपमधील प्रसिद्ध मॉर्डन डेअरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) छापा टाकून व्यावसायिकाचे पितळ उघडे केले. याप्रकरणी 1 लाख 23 हजार 691 रूपये किंमतीचे डेअरीतील हलक्‍या प्रतीचे दही, मलाई पनीर आणि क्रीम असे 561 किलो दुग्धजन्य पदार्थ एफडीए ने जप्त केले आहेत. त्यांची तपासणी करण्यासाठी नमुनेही प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.

कॅंम्प परिसरातील मॉर्डन डेअरी खाद्यपदार्थामध्ये गोलमाल करत, उच्च प्रतीचा माल आहे असे ग्राहकांना सांगून त्यांच्याकडून अतिरिक्‍त पैसे उकळत आहे. अशी माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांना समजली. माहिती खातरजमा केल्यानंतर सह आयुक्‍त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी के. एल. कांबळे, एस. एस सावंत यांनी डेअरीवर छापा टाकून बनावट माल जप्त केला. याप्रकरणी डेअरीचे मालकावर कारवाई करण्यात आली असून, त्यांना हे पदार्थ विक्री करण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. तसेच नोटीसही पाठविण्यात आली आहे. हलके पदार्थ विक्री करून दिवसाला लाखो रुपयांचा माल खपवला जात असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अस्वच्छ, दर्जा नसलेले अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकाबाबत तक्रार असल्यास ग्राहकांनी त्वरीत एफडीएकडे तक्रार करावी, असे अवाहन सह आयुक्‍त (अन्न विभाग) सुरेश देशमुख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)