फॅटी लिव्हर मधुमेही त्रस्त(भाग २)

फॅटी लिव्हर मधुमेही त्रस्त(भाग १)

रुग्णाची चाचणी कशी करावी?
उपाशीपोटी रक्तशर्करेची चाचणी करावी, जेवल्यानंतर दोन तासांनी चाचणी करावी, अनियत रक्तशर्करेची चाचणी, हिमोग्लोबिन अ-1 चाचणी आणि ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (तोंडी ग्लुकोज सहनक्षमता चाचणी) करावी. तोंडी ग्लुकोज सहनक्षमता चाचणी करणे अत्यंत सोपे असते आणि ती अनेकदा करतात. रुग्णाला 100 ग्रॅम ग्लुकोज देऊन ही चाचणी करण्यात येते.

गर्भधारणा केलेल्या महिलांची ओरल ग्लुकोज चाचणी थोडी वेगळ्या पद्धतीने करण्यात येते. त्यांना केवळ 75 ग्रॅम ग्लुकोज देण्यात येते. त्यामुळे कोणती चाचणी करावी, हे लोकांना कळू शकेल.
लोकांना उपचारांविषयी खूप काळजी वाटत असते. पण हे उपचार आहार, व्यायाम, जीवनशैलीतील सुधारणा, मानसिक तणाव कमी करणे, योगासने इत्यादींपासून सुरू होतात. नसर्गिक पद्धतीने शर्करेचे प्रमाण कमी करण्यासाठी हे उपचार करून पाहावेत. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी साखर, गूळ आणि मैद्यासारखे पदार्थ टाळावेत. मीठ आणि तेलाचे प्रमाणही कमी करावे. त्यांनी साखरेऐवजी सुक्रालोजसारखा पर्याय निवडावा.

मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी…
वजनावर नियंत्रण ठेवा. शरीरात चरबी अधिक असेल, विशेषत: पोटाच्या भागात चरबी साठून राहिली असेल तर इन्सुलिन तयार करण्यास शरीराकडून होणारा प्रतिकार वाढू शकतो. यामुळे टाइप-2 मधुमेह होण्याची शक्‍यता असते.
नियमित व्यायाम करा. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा. दररोज साधारण प्रकारची शारीरिक हालचाल केल्यास वजन नियंत्रणात राहते, रक्तशर्करेचे प्रमाण कमी होते आणि रक्तदाब आणि कोलेस्टरॉलमध्येही सुधारणा होते.
समतोल, सकस आहार घ्यावा. तुमच्या आहारातील चरबीयुक्‍त पदार्थ कमी करावेत, विशेषत: सॅच्युरेटेड आणि ट्रान्सफॅट्‌स टाळावेत. फळं, भाज्या आणि तंतुमय पदार्थ असलेला आहार घ्यावा. आहारातील मीठ कमी करावे. प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये मीठ, चरबी आणि किलोज्युल अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे ताजे घटक वापरून घरी तयार केलेले पदार्थ खाण्यावर भर असावा.
मद्यपान मर्यादित करावे आणि धूम्रपान सोडून द्यावे. प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान केल्याने वजन वाढते आणि तुमचा रक्‍तदाब आणि ट्रायग्लिसराइडची पातळी वाढते. पुरुषांनी दिवसाला केवळ दोन प्रमाणित ड्रिक्‍सपेक्षा अधिक मद्यसेवन करू नये आणि महिलांनी एका प्रमाणित ड्रिकपेक्षा अधिक मद्यसेवन करू नये.
रक्तदाबावर नियंत्रण ठेवा. नियमित व्यायाम, समतोल आहार आणि संतुलित वजन ठेवून बहुतेक जण हे साध्य करू शकतात. काही जणांना डॉक्‍टरांच्या सल्ल्‌यानुसार औषधे घ्यावी लागू शकतात.
नियमित तपासणीसाठी डॉक्‍टरांची भेट घ्या. तुमचे वय जसजसे वाढते तसतसं तुमच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण, रक्तदाब आणि रक्तातील कोलेस्टरॉलच्या पातळीची तपासणी करणे हितावह आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)