आमिरपाठोपाठ शाहरुखबरोबरही दिसणार फातिमा सना शेख

गेल्या काही दिवसांपासून शाखरुख खानच्या “सारे जहांसे अच्छा’बाबत खूप उलट सुलट बातम्या ऐकायला मिळायला लागल्या होत्या. भारताच्या चांद्र मोहिमेतील पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावरील या सिनेमाचे काम याच वर्षी सुरु होणार आहे. मात्र या सिनेमात शाहरुखची हिरोईन कोण असणार याबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. मात्र “दंगल’ मध्ये आमिर खानची मुलगी बनलेली आणि “ठग्ज…’मध्ये आमिरबरोबर रोमान्स करणारी फातिमा सना शेख “सारे जहांसे अच्छा’मध्ये शाहरुखची हिरोईन बनणार असल्याचे ऐकायला मिळाले आहे.

मात्र बी टाऊनमध्ये अजूनही या सिनेमातील शाहरुखच्या हिरोईनच्या शोधात असल्याचे ऐकायला मिळते आहे. अर्थात या हिरोईनच्या रोलसाठी फातिमाचे नाव रेसमध्ये सर्वात आघाडीवर आहे, असेही ऐकायला मिळते आहे. “सारे जहांसे अच्छा’मध्ये शाहरुखच्या आगोदर आमिरचीच निवड झाली होती. मात्र दुसऱ्या कोणत्या तरी प्रोजेक्‍टमुळे आमिरने हा सिनेमा सोडला होता. नंतर शाहरुखचे नाव जोडले गेले. शाहरुखची हिरोईम म्हणून प्रियांका चोप्राचे नाव सुचवले गेले होते. मात्र नंतर प्रियांकाचेही नाव मागे पडल्यामुळे आता फातिमाच्या नावाची चर्चा सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)