आमिर खानबरोबरच्या अफेअरबाबत फातिमा सना शेखचे स्पष्टिकरण

आमिर खानच्या अफेअरची आतापर्यंत कधीही चर्चा झाली नव्हती. आता “दंगल’ आणि “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’मध्ये आमिरबरोबर काम करणाऱ्या फातिमा सना शेखबरोबर आमिरचे अफेअर सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात फातिमाने पहिल्यांदाच स्पष्टिकरण दिले आहे. आमिर आणि अपारशक्ति खुराना यांच्याबरोबर तिचे नाव जोडले जात असल्याबद्दल फातिमाने आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे.

याबाबत फातिमाच्या आईला टिव्हीवरच्या गॉसिप न्यूजमुळे समजले. ते ऐकून फातिमाच्या आईला फार वाईट वाटले. त्यानंतर फातिमाने आपल्या आईला समजावले. अशी चर्चा जर आपल्याबाबत होत असेल तर वेळीच त्याला उत्तर द्यायला पाहिजे. आपल्या स्वभावानुसार त्या अफवेला उत्तर द्यावेच लागते. त्यामुळे आता याविषयावर बोलण्याची वेळ आली आहे, असे फातिमा म्हणाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकांचे काम बोलणे हेच असते. कदाचित अशा गॉसिप गप्पांमधून लोकांना आनंद मिळत असावा. त्यांना अशी चर्चा केल्यावरच झोप येत असावी. पण त्या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. अपारशक्ति आणि आमिर हे दोघेही आपल्यासाठी स्पेशल आहेत. त्यांच्याशी नाते जोडल्यामुळे माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. असे ती म्हणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)