मनरेगाचे भवितव्यही भाजपच्या अनास्थेमुळे डळमळीत : चिदंबरम

नवी दिल्ली: भारताच्या ग्रामीण भागातील विपरीत परिस्थितीत तेथील जनतेला ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे हक्काचा रोजगार उपलब्ध झाला होंता पण मोदी सरकारच्या अनास्थेमुळे या महत्वाच्या योजनेचेही भवितव्य डळमळीत झाले आहे अशी टीका ज्येष्ठ कॉंग्रेस नेते चिदंबरम यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यासाठी या योजनेसाठी केवळ 331 कोटी रूपयांचाच निधी शिल्लक राहिला आहे पण त्यात आता कोणतीही वाढ करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर झाल्या नाहीत. त्यांनी म्हटले आहे की पुर्वी लोकांच्या मागणीनुसार मनरेगा योजनेची कामे सुरू केली जात होती पण आता तेही धोरण भाजपने बदलेले असून आता केवळ निधी ज्या प्रमाणात उपलब्ध आहे त्याप्रमाणातच ही कामे केली जात आहेत.

केवळ निधी उपलब्ध नसल्याने अनेक गावांतील रोजगार हमीची कामे थंडावली आहेत असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. आज ग्रामीण भागातील जनता पुर्णपणे असहाय्य बनलेली असताना सरकारने मनरेगाकडे केलेले दुर्लक्ष अक्षम्य आहे. आज कृषी उत्पादन घटले आहे, नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत, ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नाहीत. अशा वेळी लोकांची भूक भागवणाऱ्या मनरेगाकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)