गुजरातमध्ये भीषण अपघात – दोन ट्रक्‍समध्ये सापडलेल्या कारमधील 10ठार, 5 जखमी!

गांधीनगर: गुजरातमध्ये महामार्गावरील एका भीषण सडक अपघातात 10 जण ठार झाले असून 5 जण जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. कच्छच्या भचाऊ जिल्ह्यात दोन ट्रक्‍सच्या मध्ये एक एसयूव्ही कार सापडल्याने ही दुर्घटना घड्‌ली. मरण पावलेले सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात आले आहे.

भरधाव वेगाने जात असलेला, मिठाने भरलेला एक ट्रक अचानक टायर फुटल्याने डिव्हायडरला आपटून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पलटी झाला. तेथून एक एसयूव्ही जात होती. तिच्यासमोर हा ट्रक आला आणि त्याच वेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती, की दोन ट्रक्‍सच्या मधे सापडलेल्या या गाडीतील 15 पैकी 10 जण जागेवरच ठार झाले, आणि 5 जण जखमी झाले आहेत. हे कुटुंब भुजच्या जेष्ठानगरचे राहणारे असून कबराऊ मोगलधारा येथून देवदर्शन करून परत घरी जात होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशोकभाई गिरिधारीलाल कोटिया (44), रिवाबेन रमेश कोटिया (40), निर्मलाबेन अशोकभाई कोटिया (38), निकिताबेन रमेश कोटिया (15). नंदिनीबेन रमेश कोटिया (16), थिरुपीबेन दिनेशभाई कोटिया(16), मोहित रमेश कोटिया (10), भावना अशोकभाई कोटिया (12), हितेशभाई सुनीलभाई (20) आणि अर्जुन सुनीलभाई (18) अशी मृतांची ओळख पटली आहे.

पलटी झालेला ट्रक मिठाने भरलेला असून ओव्हरलोड होता असे पोलीसांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी मृतांच्या कुतुंबीयांचे सांत्वन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)