बेकायदा पोल्ट्री विरोधात मंगळवारपासून उपोषण

कोरेगाव – तहसीलदारांचा आदेश डावलून ल्हासुर्णे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात घालून बेकायदा पोल्ट्री चालवली जात आहे. याच्या निषेधार्थ ग्रामस्थ दि. 20 पासून सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती भाजयुमोचे सातारा जिल्हा सरचिटणीस रमेश उबाळे यांनी दिली.

ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथील हिम्मत मुगुटराव सावंत यांची बेकायदेशीर पोल्ट्री तत्काळ बंद करण्याचा तहसीलदार कोरेगाव यांचा आदेश असतानादेखील बेकायदेशीर पोल्ट्री बंद न केल्याने दि. 15 रोजी ग्रामस्थांची व उपविभागीय अधिकारी यांची बैठक पार पडली. बैठकीत तीन दिवसात हिम्मत सावंत यांची बेकायदेशीर पोल्ट्री बंद किंवा स्थलांतरित करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांनी दिला.

-Ads-

या पोल्ट्री मालकास वारंवार बेकायदेशीर पोल्ट्री बंद करण्याचे आदेश देऊन देखील त्यांनी पोल्ट्री बंद न केल्यामुळे ल्हासुर्णे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. बेकायदेशीर पोल्ट्रीवर कारवाई न झाल्यास दि. 20 नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाचे सातारा जिल्हा सरचिटणीस रमेश उबाळे यांनी दिला. बैठकीला जगन्नाथ कुंभार, शामराव इंगळे, गौतम इंगळे, प्रवीण उबाळे, लोखंडे आण्णा, सौ. कुंभार, सौ. लोखंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)