पाकमध्ये चेहल्लुमसाठी कडक बंदोबस्त-मोबाईल, नेटवर्क सेवाही बंद ! 

इस्लामाबाद – पाकिस्तानातील शिया मुस्लिमांच्या चेहल्लुमसाठी संपूर्ण पाकिस्तानमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चेहल्लुमनिमित्त देशाच्या सर्व प्रमुख शहरांमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्ताबरोबरच सावधगिरीचा उपाय म्हणून तेथील मोबाईल आणि इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. चेहल्लुम हा शिया पंथीय मुस्लिमांचा सण आहे.

महंमद पैगंबरांचा पणतू इमाम हुसेन इब्न अलीच्या हौतात्म्याच्या दिवसापासून 40 दिवसांनी चेहल्लुम साजरा करण्यात येतो. या दिवशी शिया मुस्लिम विविध भागात मिरवणूक काढतात. पाकिस्तान सरकारने संध्याकाळपर्यंत चालणाऱ्या त्यांच्या मिरणुकीच्या मार्गावर आणि ठिकाणांवर हजारो पोलीस तैनात केले आहेत. सन 680मध्ये यहुद्यांबरोबरच्या युद्धात महंमद पैगंबरांचा पणतू इमाम हुसेन इब्न अली मारला गेला होता. त्यानंतर 40 व्या दिवशी त्याला होतात्म्य देण्यात आले.
अशा मिरवणुकांवर पाकिस्तानातील कट्टरपंथी सुन्नी गट हटकून हल्ले करतात. या दिवशी कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिळालेल्या माहितीनुसार लाहोर, कराची , पेशावर, क्वेटा, रावळपिंडी, मुजफ्फराबाद आणि मुलतानसारख्या शहरातील संचार सेवा पूर्णत: वा आंशिक स्वरूपात बंद ठेवण्यात आल्या आहेत. आपल्या दहशतवादी कारवायांच्या योजना तयार करताना आणि त्यांची अंमलबजावणी करत असताना दहशतवादी आधुनिक संचार सेवांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)