जलद बुद्धिबळ स्पर्धेचे 19 ऑगस्ट रोजी आयोजन

पुणे: वन लव्ह स्पोर्टस प्रा. लि. या संस्थेतर्फे व पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने येत्या रविवार, दि. 19 ऑगस्ट रोजी एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र मंडळ बॅडमिंटन हॉल, गुलटेकडी येथे सकाळी 9 ते सायंकाळी साडेपाच या वेळात ही स्पर्धा रंगणार आहे.
हा स्पर्धा खुला गट, 13 वर्षांखालील मुले व मुली, तसेच नऊ वर्षांखालील मुले व मुली अशा तीन गटांमध्ये होणार आहे. स्पर्धेसाठी एकूण 20 हजार रुपयांची रोख पारितोषिके पणाला लागणार असून खुल्या गटातील विजेत्याला तीन हजार रुपये व चषक, 13 वर्षांखालील गटातील विजेत्याला 1500 रुपये व चषक, तसेच 9 वर्षांखालील विजेत्याला 1200 रुपये व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे खुल्या व 13 वर्षांखालील गटांतील पहिल्या पाच क्रमांकांना रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहे. खुल्या गटातील सहा ते दहा क्रमांकांना रोख पारितोषिके, तसेच व 13 वर्षांखालील सहा ते दहा क्रमांकांना, तर 9 वर्षांखालील गटांतील पाच ते दहा क्रमांकांना पदके देण्यात येतील. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी जोसेफ डिसुझा (9850218662) किंवा सूरज चौरे (7262014371) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)