…अन्यथा ‘विधानसभा-लोकसभा’ निवडणुकीवर बहिष्कार टाकू : फारूख अब्दुल्ला

नवी दिल्ली – पंचायत व शहरी स्थानिक संस्था निवडणूकीत सहभाग न घेण्याची घोषणा नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने केली होती. त्यानंतर आता नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने शनिवारी एक धमकी दिली आहे. केंद्र सरकारने जर कलम 35A च्या संरक्षणासाठी प्रभावी पाऊल नाही उचलले तर आमचा पक्ष विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकेल, असे त्यांनी म्हटले आहे.

कलम 35A नुसार, जम्मू-काश्मीरमध्ये जन्मलेल्या व्यक्तीलाच जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळेल. म्हणजेच इतर कुणीही व्यक्ती जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक म्हणून राहू शकत नाही. शिवाय इतर ठिकाणची कोणतीही व्यक्ती जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करु शकत नाही. या कलम 35A’विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे.

नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, ’35A कलमावर तोडगा निघाला नाही तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसमोर कस जाऊ शकतो, कस त्यांना मतदान करा अस सांगू शकतो. प्रथम आम्हांला न्याय द्या आणि कलम 35A वर केंद्र सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी’ असं त्यांनी म्हटलं आहे.

‘जर तुमची योजना ही जम्मू काश्मीरच्या विशेष स्थिती ला कमजोर करण्याची असेल तर आमचा मार्ग वेगळा आहे. आम्ही निवडणुक लढवू शकत नाही. केवळ पंचायत व शहरी स्थानिक संस्था निवडणूकीत नाही तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर आमचा बहिष्कार असेल’, असं फारूख अब्दुल्ला यांनी एका स्थानिक कार्यक्रमात संबोधित करताना म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)