शेतकऱ्यांची चर्चा केल्याशिवाय मोजणी करणार नाही

उपजिल्हाधिकारी रेखा सोळंकी; शेतकरी त्यांच्या भुमिकेवर ठाम

उंब्रज – वहागाव ता. कराड येथे मंगळवारी गोटे, मुढें, खोडशी, वनवासमाची, बेलवडे, तासवडे, वराडे आणि शिवडे या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येत सहापदरीची मोजणी बंद पाडली होती. यासबंधीचे वृत्त भूसंपादनच्या उपजिल्हाधिकारी आणि महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी तात्काळ वहागाव येथे धाव घेत सर्व संपादन बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मोजणी करणार नाही याची हमी दिली.

दोन दिवसापूर्वी तासवडे येथे झालेल्या बैठकीत वहागाव येथे 18 रोजी होणारी महामार्गाची होणारी मोजणी अडवण्याचे सर्व शेतकऱ्यांनीा ठरवले होते. त्याप्रमाणे वहागाव ता. कराड येथे महामार्गावरील लोकांनी एकत्र येत सहापदरीची मोजणी बंद पाडली होती. ही बाब भूसंपादन आणि महामार्गाच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांना समजताच हे दोन्ही विभाग खडबडून जागे झाले. त्यांनी या लोकांच्या आंदोलनाची दखल घेत बाधित शेतकऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत दुपारी साडेबारा वाजता वहागाव येथे बैठकीस येण्याचे सांगितले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याप्रमाणे वहागाव, बेलवडे, तासवडे, वराडे, शिवडे, वनवासमाची, खोडशी, गोटे आणि मुंढे येथील सर्व शेतकरी वहागाव येथे बारा वाजता एकत्र आले. परंतु बैठकीची साडेबाराची दिलेली वेळ गेलली. दुपारचे तीन वाजले तरी भूसंपादन आणि महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीच्या ठिकाणी आलेच नाहीत. त्यामुळे त्यांनी आपली फसवणूक केल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली. वरिष्ठ आधिकाऱ्यांनी दिलेली वेळ निघून गेल्यामुळे शेतकऱ्यांचा संयम संपला आणि तीन वाजता सर्व शेतकरी बैठकीवर बहिष्कार टाकत निघून गेले. यावेळी सर्वेअर प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांची खूप विणवनी केली पण त्यांनाच शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले.

यावेळी महामार्ग विभागाचे अधिकारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान चार वाजता भूसंपादन उपजिल्हाधिकारी डॉ. रेखा सोळंकी आणि महामार्गाचे बी. ए. भोई वहागाव येथे आले. त्यावेळी फक्त वहागाव आणि तासवडे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी वहागाव आणि तासवडे ग्रामस्थांनी गोटे, मुंढे, खोडशी, बेलवडे, वराडे, वनवासमाची आणि शिवडे येथील शेतकरी नसल्यामुळे चर्चा करणार नाही आणि उद्याची मोजणी होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला. शेवटी भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांनी वरील संपादन बाधीत शेतकऱ्यांची दोन दिवसात कराड येथे एकत्र बैठक घेण्याचे निश्‍चित करत चर्चेशिवाय पुढील प्रक्रिया करणार नाही, असे सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी गेली असल्याने नव्याने भूसंपादन करुन देणार नसल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)