भूसंपादनाच्या प्रक्रीयेत शेतकऱ्यांनाही विश्वासात घ्या: सदाभाऊ खोत

कोल्हापूर: रत्नागिरी- नागपूर महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रीया राबविताना शेतकऱ्यांनाही विश्वासात घ्या, अशी सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. रत्नागिरी- नागपूर महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रीया गतिमान करा, अशी सूचना करून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रीया राबविताना शेतकऱ्यांच्या संपादित करावयाच्या जमिनीचा रेडी-रेकनर दराच्या चारपट दर देऊन या जमिनी संपादित कराव्यात. घरांचे व्हॅल्यूएशन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेऊन व्हॅल्यूएशच्या दुप्पट मोबदला द्यावा. तसेच भूसंपादन प्रक्रीयेबाबत केले जाणारे पंचनाम्याच्या याद्या ग्रामपंचायतीमध्ये लावाव्यात. एकूणच भुसंपादन प्रक्रीयेमध्ये सर्वाना विश्वासात घेऊनच कार्यवाही करावी.
या महामार्गासाठीच्या भूसंपादन प्रक्रीये अंतर्गत डिसेंबर अखेर ॲवॉर्ड होतील असे भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी अविनाश हादगल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)