उत्तर प्रदेशातील शेतकरी सरकारवर नाराज

लखनौ -आधीच डोक्‍यावर कर्जाचा डोंगर असताना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअतंर्गत फक्त दोन हजार रुपये मिळाल्याने हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने ही रक्कम पुन्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाठवली आहे. यासोबतच टोमॅटोची शेती करणाऱ्या या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. मदत करू शकत नाही तर किमान आत्महत्या करण्याची तरी परवानगी द्या अशी विनंतीच शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

39 वर्षीय प्रदीप शर्मा यांनी सांगितले आहे की, मला मिळालेले दोन हजार रुपये मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना परत पाठवले आहेत. पण किमान ते मला आत्महत्या करण्याची परवानगी तरी देऊ शकतात. प्रदीप शर्मा यांनी आपल्या डोक्‍यावर 35 लाखांचे कर्ज असल्याचं सांगितले आहे.

प्रदीप शर्मा आपल्या कुटुंबासोबत भाड्याच्या घरात राहतात. दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठीही त्यांना झगडावे लागत आहे. 2016 मध्ये आपल्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला पत्र लिहिलं होते, पण काहीच उत्तर आले नाही अशी माहिती प्रदीप शर्मा यांनी दिली आहे.

कर्जाने बुडलेल्या आपल्या काकांचं 2015 मध्ये निधन झाल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना माहिती कळवली होती असे प्रदीप शर्मा यांचं म्हणणे आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांना भेटण्यासाठी मी दिल्लीत गेलो होतो. पण तिथूनही मोकळ्या हाती परतावे लागले, असे प्रदीप शर्मा यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)