दिल्लीतील शेतकरी आंदोलन मागे 

मध्यरात्री मिळाली किसान घाटावर जाण्याची अनुमती 
नवी दिल्ली: मोर्चाने उत्तरप्रदेशातून दिल्लीत आलेल्या भारतीय किसान मोर्चातील आंदोलकांना किसान घाटावर जाण्याची अनुमती देण्यात आल्यानंतर त्यांनी बुधवारी पहाटेच्या सुमाराला दिल्लीतील आपले आंदोलन मागे घेतले. काल त्यांच्या आंदोलनात गृहमंत्री राजनाथसिंह यांनी हस्तक्षेप करून त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेत समझोता झाल्याची घोषणा सरकारच्या पातळीवर करण्यात आली होती पण आंदोलकांनी मात्र असा कोणताही समझोता झाला नसल्याचे नमूद करीत धरणे आंदोलन सुरच ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे दिल्लीत पेच प्रसंग निर्माण झाला होता.
या मोर्चेकऱ्यांना उत्तरप्रदेश-दिल्ली सीमारेषेवर अडवण्यात आले होते. या आंदोलकांनी किसान घाटावर चौधरी चरणसिंह यांच्या समाधीस्थळी जाण्याचा आग्रह धरला होता. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमाराला त्यांना तेथे जाण्याची अनुमती देण्यात आली होती. त्यानंतर हजारो शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन चौधरी चरणसिंह यांच्या समाधीवर आदरांजली वाहिली. ट्रक, ट्रॅक्‍टर इत्यादी वाहनांनी हे आंदोलक शेतकरी काल दिल्लीच्या परिसराकडे येत असताना त्यांना तेथे पोलिसांनी बॅरीकेट्‌स लाऊन अडवले होते. त्यावेळी हे अडथळे दूर करून आंदोलकांनी तेथे घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार व अश्रुधुराचा वापर केल्यान आंदोलन आणखीनच चिघळले होते.
तथापी रात्री साडेबाराच्या सुमाराला पोलिसांनी ही बॅरीकेट्‌स हटवली असे आंदोलकांचे एक नेते पवन खतना यांनी सांगितले. त्यानंतर दोन तासात हे शेतकरी किसान घाटावर पोहचले आणि पहाटे पाच च्या सुमाराला आंदोलन माघारीची घोषणा करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केल्याचे आंदोलकांच्या नेत्यांनी सांगितले. या आंदोलनात उत्तरप्रदेश बरोबरच राजस्थान, हरियाना, मध्यप्रदेश या राज्यातील शेतकरीही सहभागी झाले होते. त्यांची संख्या जवळपास तीस हजार इतकी होती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)