प्रधानमंत्री किसान योजनेंसाठी शेतकऱ्यांची धावपळ

नागठाणे – केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्‍टरपर्यंत शेतजमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, त्यामध्ये बॅंक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक ग्रामस्तरीय समितीकडे सादर करण्यासाठी गावा-गावात शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. प्रशासनाचीही संबंधित शेतकऱ्यांची माहिती भरून घेण्यासाठी धावपळ उडत आहे.

संबंधित तलाठ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समितीमध्ये कृषी सहायक व ग्रामसेवकांचा समावेश आहे. ग्रामस्तरीय समितीकडून तयार करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांची तालुकास्तरीय समित्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र याद्या राज्य आणि केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहेत. या प्रक्रियेत ग्रामस्तरीय समितीकडून शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक घेण्यात येत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)