कराड-पाटणमधील शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना

कडेगाव – ऊस हे राज्यातील एकमेव शाश्वत पीक आहे. त्यामुळे या पिकाकडे जास्तीत-जास्त शेतकरी वळत आहेत, ऊस पिकात ठिबक सिंचनचा वापर करुन रासायनिक खते, पाणी व श्रमाची बचत करावी, असे प्रतिपादन वसंतदादा साखर संघाचे संचालक विकास देशमुख यांनी केले.

हिंगणगाव खुर्द, ता. कडेगाव येथील सुनील बबनराव पाटील यांच्या शेतावर क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस पिक चर्चासत्र आणि शिवार फेरीमध्ये केले. अध्यक्षस्थानी क्रांती उद्योग समुहाचे प्रमुख अरुण अण्णा लाड होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्राची भौगोलिक रचना ऊस पिकासाठी अनुकूल आहे. त्यामुळे एकरी 200 मी. टनापर्यंत उत्पादन घेणे शक्‍य आहे. ऊस पिकाला जास्त पाणी लागत असल्याचे अनेकांचे मत आहे. परंतु हे पूर्णतः चुकीचे आहे. उलट हे पीक कोणत्याही वातावरणात तग धरुन राहू शकते. शास्त्रज्ञ आर. एस. हापसे म्हणाले, ऊसाचे उत्पादन वाढीस पंचसुत्रीचा वापर करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे हमखास निश्‍चित उत्पादन काढता येते. ऊसाला लागणारी 16 अन्नद्रव्ये ही ठिबकच्या माध्यमातून द्यावीत.

कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड म्हणाले, तंत्रज्ञानाचा उपयोग करुन शेती केली तर नक्की फायदा होतो. क्रांती कारखान्याच्या ऊस विकास सुविधांचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. यावेळी जयप्रकाश साळुंखे, अंकुश यादव, जयराम कुंभार, अरविंद कदम, महावीर बिरणाळे, आप्पासो जाधव, महावीर चौगुले, दाजीराम मोहिते, प्रशांत चौगले, सुनील सावंत, दिलीप जाधव, हणमंतराव मोहिते, अशोक साळुंखे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)