शेतकऱ्यांनी मोदींना ताकद दाखवली : राहुल गांधी

जयपुर: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जयपुर मध्ये शेतकऱ्यांचा मेळावा घेतला. या राज्यातील सत्ता मिळवल्यानंतर त्यांनी आयोजित केलेली ही पहिलीच किसान रॅली होती. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की या राज्यातील शेतकऱ्यांनी खूप सोसले आहे. त्यांनी आपली ताकद पंतप्रधान मोदींना दाखवून दिली आहे. राजस्थानासह अन्य राज्यांमध्ये झालेला सत्ता बदल हा त्याचाच पुरावा आहे असे त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की राजस्थानातील शेतकऱ्यांना आम्ही सत्तेवर येताच कर्जमाफी दिली पण तेवढी पुरेशी नाही. आपल्या अन्यही अनेक समस्या सोडवाव्या लागतील त्यासाठी पुन्हा एक नवी हरित क्रांती आणावी लागेल. यावेळीही त्यांनी राफेल प्रकरणाचा उल्लेख करून सांगितले की चौकीदार लोकसभेतील राफेल वरील चर्चेला उपस्थित राहिला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आम्ही जेपीसी नेमून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे ती त्यांनी मान्य केलेली नाही. जर राफेल प्रकरणात त्यांची बाजू खरी असेल तर चौकशीला ते का घाबरतात असा सवालही त्यांनी केला. लोकसभेत निर्मला सीतारामन यांनी आपण राफेल प्रकरणात उपस्थित केलेल्या प्रश्‍नांनाही उत्तरे न देता पळ काढला असे ते म्हणाले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)