पाथर्डी तहसीलवर शुक्रवारी शेतकऱ्यांचा मोर्चा

पाथर्डी – राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन पिण्याचे पाणी, रोजगार व चाऱ्यासाठी गावे सोडण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीतही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत, शेतकरी अडचणीत असताना राज्यकर्त्यांना निवडणूक महत्त्वाची वाटते, त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या शुक्रवारी तहसील कार्यालयावर 15 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढून शासनाला जाब विचारणार असल्याची माहिती केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिली.

याबाबत माहिती देताना ढाकणे म्हणाले, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विभाजनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. जिल्ह्याचे विभाजन त्वरित करून नगर दक्षिण जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होण्याची गरज आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. सर्व व्यवस्था पूर्णपणे कोलमडून जगण्याचे सर्व मार्ग बंद पडले आहेत, खरीप हंगाम वाया गेला तर रब्बीच्या पेरण्यासुद्धा होऊ शकल्या नाहीत शेती व शेतकरी उध्वस्त झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाथर्डी शेवगाव तालुक्‍यात सध्या 60 हून अधिक टॅंकर सुरू आहेत, टॅंकर भरण्यासाठी सुद्धा शाश्वत उद्‌भव नाही. विजेचे भारनियमन बंद करावे, बोंडअळी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, तहसीलदारांना टॅंकर मंजुरीचे अधिकार मिळावेत, दोन्ही तालुक्‍यातील गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी लावून जाहीर करावी, रोजगार हमीची कामे, चारा छावण्या सुरू होऊन कर्ज वसुली थांबवावी, शैक्षणिक फी माफ करावी आदी मागण्या आहेत असे ढाकणे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)