अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्‍टर खरेदीसाठी अनुदान

File Photo

नगर – सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना 100 टक्‍के अनुदानावर पॉवर टिलरचा पुरवठा करणे ही वैयक्‍तिक लाभाची योजना राबविण्यात येत होती. ही योजना बंद करण्यात आली असून, त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्त्री, पुरुष स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्‍टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

बचत गटांना मिनी ट्रॅक्‍टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर याची खरेदी करण्याचे अधिकार लाभार्थी बचत गटांना देण्यात आले आहेत. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांना अनुज्ञेय किमान 9 ते 18 अश्‍वशक्‍तीपेक्षा जादा अश्‍वशक्‍तीचा ट्रॅक्‍टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता कमाल शासकीय अनुदानापेक्षा (3 लाख 15 हजार अनुदान रक्‍कम) जास्त अनुदान देण्यात येणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनुदानाव्यतिरिक्‍त जादाची रक्‍कम बचत गटांना स्वतः खर्च करावी लागेल. 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता योजनेचे निकष पूर्ण करुन मिनी ट्रॅक्‍टर व त्याची उपसाधने याची खरेदी शासनाचे अनुदान मिळण्यापूर्वी स्वतः करु इच्छित असणाऱ्या स्त्री व पुरुष स्वयंसहाय्यता बचत गटांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्याण यांच्या कार्यालयात येथे विनामूल्य उपलब्ध आहेत. पात्र असणाऱ्या स्त्री व पुरुष स्वयंसहाय्यता बचत गटांनी संपूर्ण कागदपत्रासह अर्ज जमा करावेत, असे सहायक आयुक्‍त पांडुरंग वाबळे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)