हतबल शेतकऱ्यावर उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ!

उत्पादन खर्च, मजुरी खर्च त्यांनंतर टोमॅटो विक्रीला बाजारात नेण्यासाठी येणारा वाहतूक खर्चसुटत नसल्याने आज उभ्या पिकात मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे. जयराम धोंडीबा ढेरंगे, शेतकरी

जयराम धोंडीबा ढेरंगे, शेतकरी

संगमनेर: पावसाळा अंतिम चरणात आला तरी वरुणराजा न बरसल्याने व शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकऱ्याचे अर्थकारण कोलमडले आहे. टोमॅटोला प्रतिकिलो अडीचरुपये तर झेंडूच्या फुलाला सात रुपये भाव मिळत असल्याने गुंतविलेले भांडवलदेखील वसूल होत नाही. त्यामुळे उभ्या पिकात जनावरे सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बहुतांश गावे अवर्षणग्रस्तच. नदी व पाण्याचा स्त्रोत नसल्याने पाण्याचे व्यवस्थापन करून बहुतांश शेतकऱ्यांरी इतर पिकांबरोबर टोमॅटो व झेंडूची पिके घेत आहे. ह्या वर्षी सुरवातीला पाऊस झाल्याने खंडेरायवाडी येथील जयराम धोंडीबा ढेरंगे या शेतकऱ्याने पाच एकर टोमॅटो व अडीच एकर झेंडू पिकांची लागवड केली. मोठ्या प्रमाणात खर्च या पिकावर करण्यात आला होता. त्यातून पिके चांगली बहारात आली. गेल्या वर्षी २० किलोच्या क्रेटला ४०० रुपये भाव मिळला होता. यंदा मात्र हा दर ५० रुपयावर आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षी झेंडूच्या फुलांचे उत्पादनात भरमसाट वाढ झाल्याने गणपतीत पण फुलांच्या दारात वाढ झाली नाही सात रुपये किलो फुले विकावी लागत आहे. उत्पादन खर्च दूर तोडणी व वाहतुकीचा खर्च भागात नसल्याने बेहाल झालेल्या ढेरंगे यांनी आज पाच एकर टोमॅटो व अडीच एकर झेंडूच्या उभ्या पिकात मेंढ्या सोडल्या आहेत. पाऊस नसल्याने मेंढरांना टोमॅटोच्या बागा उपलब्ध होत आहे. मात्र शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)