फरहानने मागितली गर्लफ्रेंड शिबानीची माफी

बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे त्यांच्या संबंधाबाबत खुलेआमपणे बोलताना दिसत नाही. पण ते सतत पार्टीज्‌ आणि व्हकेशनवर एकत्रितपणे मस्ती करताना दिसून येतात. त्यातच काही दिवसांपूर्वी फरहानला सर्वांसमोर शिबानीची माफी मागावी लागली. फरहान अख्तर जितका त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो, तेवढाच तो त्याच्या दिलखुलास स्वभावाबाबत ओळखला जातो.

त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वीच एका शोमध्ये फरहानला बेस्ट ड्रेस्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. यावेळी शिबानीही उपस्थित होती. याप्रसंगी शोच्या होस्टने फरहानला प्रश्‍न केला की, तु तुझया सुटवर एवढे प्रमे कसे करतो? यावर त्याने विनोदी अंदाजात प्रथम चुप्पी साधली. त्यानंतर त्याच अंदाजात आपल्या सूटवर प्रेम करत असल्याबद्‌दल शिबानीची माफी मागितली.

दरम्यान, फरहान आणि शिबानी पहिल्यांदाच एकत्रित एका प्रॉजेक्‍टमध्ये काम करत आहे. हा एका म्यूझिक व्हिडिओ असून तो शिबानीवर चित्रित करण्यात आला आहे. यासाठी फरहान एक गाणे लिहित आहे. याशिवाय फरहान लवकरच सोनाली बोससोबत “द स्काई इज पिंक’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि सिद्धार्थ रॉय-कपूरसही अन्य कलाकार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)