मानुषी छिल्लरला लॉंच करणार फराह खान

2017 च्या “मिस वर्ल्ड’चा किताब पटकावणारी मानुषी छिल्लर आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. फराह खान दिग्दर्शित करणार असलेल्या सिनेमातून मानुषी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समजते आहे. मानुषी आणि फराह खानने या नवीन सिनेमाबाबत सविस्तर चर्चाही केली आहे. एवढेच नाही, तर मानुषीने या सिनेमाच्या स्क्रीप्टवर काम करायलाही सुरुवात केली आहे. याच कामासाठी ती मध्यंतरी गोव्याला गेली होती.

मानुषी धर्मा प्रॉडक्‍शनच्या सिनेमातून पदार्पण करणार असे पूर्वी ऐकायला मिळाले होते. तिला बॉलिवूडमध्ये सलमान खान लॉंच करणार असेही ऐकायला मिळाले होते. मात्र आता मानुषीला लॉंच करण्याची जबाबदारी फराह खानने स्वीकारली आहे. यापूर्वी मानुषीने रणवीर सिंहबरोबर एका जाहिरातीमध्ये मॉडेलिंगही केले आहे. हिंदी सिनेमात काम करण्याची आपली ईच्छा मानुषीने यापूर्वी अनेकदा व्यक्‍त केली आहे.

यापूर्वी फराह खानने “ओम शांति ओम’मधून दीपिका पदुकोणला लॉंच केले होते. आज हीच दीपिका पदुकोण बॉलिवूडवर अधिराज्य गाजवते आहे. 2017 मध्ये मानुषी “मिस वर्ल्ड’ बनली होती. तिच्यापूर्वी प्रियांका चोप्राने 2000 साली हा किताब जिंकला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)